Ad will apear here
Next
जकात
मला चांगले ठाऊक आहे,
दूर देवदूतांच्या प्रदेशात
मला प्रवेश नाहीये.

पण माझ्या टिचभर परगण्यात
तरी त्यांची ये-जा कुठे असते?

मला चांगले ठाऊक आहे,
दूर देवदूतांच्या प्रदेशात
मला प्रवेश नाहीये.

पण माझ्या इवल्याशा वेदनेला
सुद्धा का त्यांनी तडीपार केलंय?

मला चांगले ठाऊक आहे,
दूर देवदूतांच्या प्रदेशात
मला प्रवेश नाहीये.

पण माझ्या तीळभर सुखावर
का त्यांनी जकात बसवलीय?

- प्रभाकर (बापू) करंदीकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZPFCH
Similar Posts
आत्म्याचा इतिहास त्याला परवा निक्षून सांगितलं मी, ‘आज मला बोलायचंय तुझ्याशी, गंभीरपणे, काही मूलभूत गोष्टींविषयी.’ त्याने, नेहमीसारखं मोनालिसा स्मित केलं. ‘ठीक तर. मला सांग तुझा इतिहास. तो कळल्याशिवाय मला तू कसा समजणार?’
पुढचा प्रवास काल किंवा कदाचित परवा असेल, एक मोठी गंमतच झाली. म्हणजे मला चक्क मरणच आले. हो, अगदी खेळ खल्लास झाला. मी आपला दुपारी निवांत घरी आरामखुर्चीत पडून वाचत होतो काही बाही तर एकाएकी अक्षरे अंधुक झाली, काही दिसेनासे झाले.
करणार का मला मदत, थोडीशी? करणार का मला मदत, थोडीशी? पण, मी कोण ते आधी सांगायला हवं, नाही का? तर, जे जे या जगी जगते, तयामधी असतात माझे भाई बंद किंवा मी. आमची संख्या किती? अमिबापासून ते माणसापर्यंत आणि हरित पेशीपासून वृक्षांपर्यंत संख्या येईल का मोजता तुम्हाला? नाही ना? दगड-धोंडे, नद्या-नाले, वाळवंटं-पठारं, वनं, शेतजमिनी
शब्द शब्दांचीच वाणी शब्दांचीच गाणी तुझ्या माझ्या ओठी रेंगाळती शब्दांमधे भाव हृदयाचा ठाव शब्दांनीच नाते सांधलेले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language